uday samant , chiplun , Koyna Project Affected Citizens
uday samant , chiplun , Koyna Project Affected Citizens  saam tv
महाराष्ट्र

Chiplun : 'उद्योग मंत्री उदय सामंत आम्हांला न्याय देतील' चिपळूण दाै-याकडं सा-यांचे लक्ष

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Uday Samant : कोयना प्रकल्पग्रस्तांना (koyna Dam Project Affected Citizens) उपोषणा दरम्यान दिलेल्या आश्वासनाचा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना विसर पडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बैठकीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना उद्योग मंत्री उदय सामंत हे आजच्या चिपळूण (Chiplun) दौऱ्यामध्ये न्याय मिळवून देणार का असा सवाल आता प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. (Breaking Marathi News)

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र अधिवेशन संपून दोन महिने झाले तरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर अद्याप बेठक झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Chiplun Latest Marathi News)

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले गेले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या या लढ्याला यश आले नाही. त्यामुळे सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोफळी येथील महानिर्मिती कंपनीच्या कार्यालयासमोर 150 प्रकल्पग्रस्तांनी 15 ऑगस्ट 2022 पासून उपोषण सुरू केले होते.

हे उपोषण सात दिवस चालले. त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर बेठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पावसाळी अधिवेशन 25 ऑगस्ट पर्यंत चालले या दरम्यान बैठक होईल असे उपोषणकर्त्यांना वाटले होते. (Maharashtra News)

मात्र अधिवेशना दरम्यान बैठकीचे निमंत्रण आले नाही त्यामुळे उपोषण संपविण्यासाठी पत्राची खेळी केली गेली अशी चर्चा सुरू झाली. आज (गुरुवार) उद्योग मंत्री उदय सामंत हे चिपळूण दाैऱ्यावर येणार असून यावेळी प्रकल्पग्रस्त त्यांची भेट घेणार आहेत. आता तरी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant Latest Marathi News) यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांमधून केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड

Today's Marathi News Live: २ जणांचा जीव घेणाऱ्या "त्या" अल्पवयीन तरुणाला तात्काळ जामीन

Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी कोणती घ्यावी खबरदारी?

Online Fraud : पिझ्झा फ्रेंचायसी देण्याचे कारण सांगत साडेअकरा लाखांत फसवणूक

Benifits of Vegetables: फळं आणि भाज्या खाल्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT