koli samaj dhule to mumbai padyatra from 17 november  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी शुक्रवारी निघणार धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा

कोळी समाजावर अन्याय हाेत असल्याचा आराेप समाजाकडून करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News :

कोळी समाजाला अनुसूचित जातीच्या वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी धुळे ते मुंबई पायी मोर्चा (koli samaj dhule to mumbai padyatra) आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे. हा माेर्चा 17 नोव्हेंबरला धुळेहुन मुंबईला निघेल अशी माहिती कोळी समाज नेते शान सोनवणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी समाज आहे. या समाजावर सरकार अन्याय करत आहे. त्यामुळेच कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी कोळी समाज आता आक्रमक झाला आहे.

खान्देशात कोळी समाजाची चार लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे तर आदिवासी टोकरी कोळी म्हणून चार आमदार देखील खान्देशतून निवडून जात असतात. त्यामुळे कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गातून जातीच्या दाखला आणि सुविधा मिळावा यासाठी वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान शासन दुर्लक्ष करत असल्याने मुंबई मंत्रालयावर टोकरी कोळी समाजाच्या मोर्चा धडधडणार असल्याचे साेनवणे यांनी नमूद केले. या माेर्चात काेळी समाज माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असल्याचे साेनवणे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT