Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: नोकरी अन् पैशांच्या हव्यासापोटी भोंदूबाबाकडे गेली, अन् नको ते घडलं...; मंत्रोच्चार करून तरुणीवर...

Kolhapur Hathkanangle Crime News: एका अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केला आहे. नोकरी आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून त्याने हे कृत्य केले आहे.

Bhagyashree Kamble

कोल्हापूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केला आहे. नोकरी आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून त्याने हे कृत्य केले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कोडोली पोलीसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अल्पवयीन मुलगी ही हातकणंगले तालुक्यातील एका गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तरूणी गरीब कुटुंबातील असून, तरूणीला नोकरी लागावी आणि आर्थिक आधार मिळावा, यासाठी एका एजंट महिलेशी तिची भेट घडवून दिली. तिला भोंदू बाबाजवळ नेण्यात आले. हा भोंदू बाबा करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

भोंदू बाबाने नोकरी आणि आर्थिक मदतीचे आमिष तरूणीला दाखवले. हेच आमिष दाखवून त्याने तरूणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींची शोध घेण्यास सुरूवात केली.

भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी करून तीन आरोपींना अटक केली आहे. भोंदूबाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे, एजंट सुप्रिया हिम्मत पवार आणि वाहन चालक मनोज अशोक असे आरोपींची नावे आहेत. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या तीन आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ह्यूमन राईट संस्थेचा पुढाकार

या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ह्यूमन राईट संस्थेनेही पुढाकार घेतला. तसेच पोलिसांकडे आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. संस्थेच्या सहकार्याने गुन्हा दाखल केला असून, पीडितेला मदत आणि संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी

Milk Cake Recipe: गोड आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते? घरी बनवा मऊ आणि दाणेदार मिल्क केक; जाणून घ्या सोपी रेसिपी

Cinnamon Tea For Diabetes: डायबिटीज असणारे दालचिनीचा चहा पिऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT