Kolhapur Viral Reel Saam Tv News
महाराष्ट्र

Kolhapur Viral Video: विद्येच्या मंदिरात सिंघमच्या डायलॉगबाजीवर रिल, एक चूक अन् गडी फसला

Kolhapur Viral Reel Video: जिल्हा परिषद शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, सिंघम डायलॉगवर व्हिडिओ केल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. तसेच मुख्याध्यापकांनी फोटो काढण्यासाठी परवानगी दिल्यामुळे संतापात आणखीन भर पडलीय.

Bhagyashree Kamble

आजकाल प्रत्येकाला रिलचं वेड लागलंय. अनेक जण रिल करतात, अपलोड करतात आणि फेमसही होतात. मात्र, रिलमुळे वादात अडकण्याची देखील शक्यता असते. आता कोल्हापूरच्या एका तरूणानं केलेला व्हिडिओच पाहा. जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम डायलॉगवर एकानं व्हिडिओ केला अन् नव्या वादला तोंड फुटलं. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, मुख्याध्यापकांनी फोटो काढण्यासाठी परवानगी दिल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जिल्हा परिषद शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, सिंघम डायलॉगवर व्हिडिओ केल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल रिलमध्ये शाळेतील खुर्चीला लाथ मारून, तरूण सिंघम चित्रपटातील डायलॉग बोलत आहे. तसेच शाळेतील इतर साहित्यांचा देखील वापर करत आहे. त्याच्यासोबत आणखीन असलेले तरूण देखील रिलमध्ये अॅक्टिंग करताना दिसत आहेत.

रिल तयार करताना एका तरूणानं खुर्चीला लाथ मारली. जिथं आपण शिकलो, तिथं लाथ मारल्यासारखा प्रकार घडल्यानं ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तसंच रिलसाठी शाळेतील इतर साहित्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. हा रिल तयार करण्यासाठी परवानगी मुख्याध्यापकांनीच दिली असल्यानं संतापात आणखीन भर पडलीय. या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.

शाळेच्या सुरक्षेची चिंता व्यक्त

जिल्हा परिषद शाळांमध्ये, शाळेच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत. तरी देखील शाळेचा वापर रिल्स करण्यासाठी झाल्यानं, अशा वेळी शाळा समिती काय करत होती? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. मुख्याध्यापकांना शाळेच्या सुरक्षेची चिंता नाही का? असे व्हिडिओ किंवा फोटो काढायला मुख्याध्यापक परवानही देऊच कसे शकतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT