Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Heartbreaking : गटारात अडकलेल्या लहान भावाला वाचवायला गेला आणि स्वतःचा जीव गमावून बसला, कोल्हापूर जिल्ह्यातील मन हादरवणारी घटना

Kolhapur News : कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना घडली. गटारात कोसळलेल्या लहान भावाला वाचवताना मोठा भाऊ केदार कांबळे याचा मृत्यू झाला. मात्र त्याने आपल्या ९ वर्षीय भावाला वाचवले. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात ९ वर्षीय मुलगा गटारात पडला त्याला वाचवायला त्याच्या मोठ्या भावाने गटारात उडी मारली

  • या दुर्घटनेत ११ वर्षीय केदार कांबळे याचा मृत्यू झाला आहे.

  • स्थानिक व अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे जॉन (९) याला वाचवण्यात यश.

  • या घटनेने परिसरात व कांबळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

कोल्हापुरात धक्कदायक घटना घडली आहे. साडेतीन फूट खोल गटारात कोसळलेल्या लहान भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने गटारात उडी मारली. मात्र लहान भावाला वाचवण्यात यशस्वी झालेल्या मोठ्या भावाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. सदर घटना सायंकाळी ५ च्या सुमारास फुलेवाडी रिंगरोडवरील अहिल्यादेवी होळकरनगरात घडली आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलाचे नाव केदार कांबळे (वर्षे ११) असून त्याच्या लहान भावाचे नाव जॉन मारुती कांबळे (वर्षे ९) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती कांबळे पत्नी व तीन मुलांसोबत फुलेवाडी रिंगरोडवरील दत्त कॉलनी परिसरात वास्तव्यास आहेत. कांबळे यांची मुलं घराजवळील काही अंतरावर शिकवणीसाठी गेली होती. शिकवणी संपवून घरी परतताना कांबळे यांचा लहान मुलगा जॉनचा पाय घसरला आणि तो गटारात कोसळला. जॉनला पडताना पाहून जॉनच्या मोठ्या भावाने केदारने देखील गटारात उडी मारली.

प्रवाहासोबत दोघेही ३० ते ३५ फूट वाहत जाऊन चेंबरखाली एका पाण्याच्या पाईपला अडकून पडले. पाठीला दप्तर असल्याने दोघेही एका जागी अडकून पडले. केवळ तोंड पाण्याबाहेर असल्याने दोघे श्वास घेत ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याने शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले. त्यांनी एका बाजूने पाण्याचा प्रवाह वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

गटारात अडकलेल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी सलिम मुल्ला, सचिन घोरपडे हे गटारात उतरले, पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पुढे जाता येत नव्हते. शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते किरण पाटील, चंद्रकात पोवार, अर्जुन पाटील, अनंदा कांबऴे, महेश मगदूम यांनी गटाराच्या दुसऱ्या टोकाला जाऊन सिमेंट पत्रा टाकून पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला. पण, गटाराच्या चिंचोळ्या भागात दोघे अडकून पडल्याने तिथे पोहोचणे अशक्य बनले होते.

घटनास्थळी स्थनिकांच्या मदतीला अग्निशमन दलाचे पथकही हजर झाले होते. स्टेशन फायर ऑफिसर मनीष रणभिसे यांच्यासह किसन पवार, सुभाष मगदूम, अमोल शिंदे या जवानांनी मुलांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे केले. चिंचोळ्या गटारातून आत जाऊन जवानांनी केदार व जॉनला पाण्यातून बाहेर आणले. केदारच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध झाला होता.

त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनातूनच दोघांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. नाकातोंडात पाणी गेल्याने केदार कांबळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर जॉन मारुती कांबळे (वय ९) याला वाचविण्यात यश आले. सध्या जॉनला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. दरम्यान या घटनेने गावात आणि कांबळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar: नवरा- बायकोचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला, भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Panchgani : क्षितिजावर आनंदाची साद! निसर्ग, थरार आणि बरंच काही... चला पाचगणीला!

SCROLL FOR NEXT