kolhapur news update Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

kolhapur news update : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या स्लॅबखाली अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगण्यात येत आहे.

Vishal Gangurde

कोल्हापूरच्या फुलेवाडीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

दुर्घटना मंगळारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली

काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरु, बचाव पथक दाखल

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरात फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्याच इमारतीचा स्लॅब आज मंगळवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या स्लॅबखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या स्लॅबखाली काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं.

घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारतीचा स्लॅबचं काम नव्याने सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर अपघातस्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील पोहोचले आहेत.

फुलेवाडीतील या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी मदतीसाठी सतत प्रयत्न करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रींचा वापर करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Sunday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींवर सुर्यदेव होणार प्रसन्न; वाचा रविवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा इशारा

ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

SCROLL FOR NEXT