kolhapur rto office saam tv
महाराष्ट्र

RTO च्या कामात 'सारथी'चे विघ्न, नागरिकांना मनस्ताप

राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र यांच्याद्वारे अडचणी दूर करणेचे कामकाज चालू आहे. या कामकाजास संगणकावरील डेटाबेस फाईल साईज जास्त असल्याने कालावधी लागत आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील (आरटीओ) सर्व्हर डाऊन झाल्याने येथील कामकाज ठप्प झाले आहे. विशेषत: या दाेन्ही कार्यालयातील लर्निंग लायसन्ससह इतर विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या तीन दिवसांपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांनी त्यांच्या कामसााठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यांना आेटीपी येत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना पुढील काेणतीही कार्यवाही करता येत नाही. परिणामी त्यांचा कामाचा खाेळंबा हाेत आहे.

याबाबत सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण म्हणाले सारथी संगणक प्रणाली वापरकर्त्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. सारथी प्रणाली वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. संगणकावरील डेटाबेस फाईल मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झालेने सारथी संगणक प्रणालीला अडचणी येत आहेत.

याबाबतीत राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र (NIC) यांच्याद्वारे अडचणी दूर करणेचे कामकाज चालू आहे. या कामकाजास संगणकावरील डेटाबेस फाईल साईज जास्त असल्याने कालावधी लागत आहे. (Maharashtra News)

सारथी संगणकीय प्रणालीवरील तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील असे राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र (NIC) ने कळविले आहे. तरी काही कालावधीतच सारथी संगणकीय प्रणालीशी असणा-या तांत्रिक अडचणी दूर होतील व सारथी संगणक प्रणाली सुरळीतपणे चालू होईल असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT