Sharad Pawar News saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Sabha: 'देशात बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही', सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

Sharad Pawar Kolhapur Sabha: 'देशात बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही', सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Kolhapur Sabha: ''शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. जीव जाणं ही साधी गोष्ट नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नाही. कांदा हा जगात पाठवला पाहिजे. मात्र मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवलेला आहे. बाहेर देशात या कांद्याला ग्राहक मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली. पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे'', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करत ते म्हणाले आहेत की, ''या सरकारमध्ये लोक महागाईने त्रासले आहेत. आम्ही कष्ट करायला तयार आहे, घाम गळायला तयार आहे, आम्हाला नोकरी द्या अशी मागणी देशातील तरुण करत आहेत.''

शरद पवार म्हणाले की, ''दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन झालं. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी कुटुंबासोबत आंदोलन केलं. मोदी सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान कुठल्याही सरकारने केला नाही.''  (Latest Marathi News)

शरद पवार पुढे म्हणाले की, ''मणिपूरमध्ये दोन समाजा संघर्ष आहे. आया बहिणींची धिंड काढली जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी महिलांना सुरक्षा दिली नाही. आया बहिणींना सुरक्षा देण्याची ताकद ज्यांच्यात नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.''

ते म्हणाले की, ''आज सत्तेचा वापर विरोधी पक्षांच्या लोकांना त्रास देण्यासाठी होत आहे. तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. त्यांना आमच्या गटात या असं सांगण्यात आलं, जर आला नाही तर, तुमची जागा तुरुंगात आहे, असेही सांगितलं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT