Kolhapur  Saam Tv
महाराष्ट्र

Robbery Case: एक डायलॉग ठरला चोरीला निमित्त, प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं अन् उघडकीस आला भलताच प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना कोल्हापूर (Kolhapur News) शहरात घडलेली आहे. एका चप्पल व्यावसायिकाला दुसऱ्या हवाला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने अपमानास्पद एक डायलॉग मारल्याने दरोड्याचे प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे.

'मै तो करोडों मे सोता हू, तू मेरा क्या बिघाडेगा' असा डायलॉग कोल्हापुरातील गांधी नगरमधील एका व्यापाऱ्याने दुसऱ्या एका चप्पल व्यवसायिकाला मारला. याच डायलॉगचा राग चप्पल व्यवसाय संजय शिंदेला आला. त्याने डायलॉग मारणाऱ्या संतोष कुकरेजाला धडा शिकवण्यासाठी फिल्मी स्टाईलने दरोडा घालण्याचा कट रचला.  (Breaking Marathi News)

मुख्य सूत्रधार संजय शिंदे याने सुरुवातीला बदला घेण्यासाठी इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांना हवाला मालकाकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती दिली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनत 80 लाखांची लूट केली. या कटामध्ये कुकरेजा यांच्याकडे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना त्यात सामील करून घेतलं.

ठरलेल्या प्लॅननुसार, दुकानात आलेली रक्कम या दोघांनी शिंदे याला सांगितली. रक्कम घेऊन दुकानातील कर्मचारी बाहेर पडताच राहुल मोरबाळे या चांदी व्यवसायिकाने इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगत 80 लाखाची रक्कम लुटली. या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ही रक्कम कुठली आहे याचा तपास ही पोलीस घेत आहेत.

एखाद्या डायलॉगचा परिणाम कुठं आणि किती गंभीर होऊ शकतं याच ताजं उदाहरण या पुलावरातल्या प्रकरणावरून समोर आलेला आहे. कोकरे ज्याची मग्रुरी उतरवण्यासाठी केलेला प्लान हा संतोष शिंदेच्याच अंगलट आला खरा पण यातून हवाल्याचं प्रकरण बाहेर आल्याने पोलिसांनी तपासाची सूत्र तिथे वळवली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT