Kolhapur Coronavirus News Update Saam TV News
महाराष्ट्र

Coronavirus : कोरोनाचा आणखी एक बळी, कोल्हापूरमध्ये ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Covid Death: कोल्हापूरमध्ये ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू. जिल्ह्यातील २०२५ मधील पहिला बळी. राज्यातील कोरोना बळींची संख्या ४ वर. पुणे, मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क.

Namdeo Kumbhar

Kolhapur Coronavirus News Update : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. देशातील आणि राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वसई, कल्याण-डोंबिवलीमध्ये आता कोल्हापूरमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. २०२५ मध्ये कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील चिंता वाढली आहे. कोरोनामुळे कोल्हापूरमध्ये ७५ वर्षांच्या महिलेच्या मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरमध्ये कोरोनामुळे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनासोबत मधुमेह आणि हायपर टेन्शनचाही त्रास होता. गेले चार दिवस त्यांच्यावर सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार सुरू होते. नव्याने सुरू झालेल्या कोरोनाचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनामुळे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

राज्यात सर्वाधिक रूग्ण पुण्यात

राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यामध्ये मागील २४ तासात ६५ नवे रूग्ण आढळले होते. त्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद आहे. मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली. ६५ रुग्णांपैकी सर्वाधिक २५ रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण ६५ रुग्णांपैकी २५ पुणे महापालिका, मुंबईत २२, ठाण्यात ९, पिंपरी चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये २ तर नागपूरमध्ये एक अशी संख्या आहे.

कोरोना फोफावतोय, चिंता वाढली -

भारतात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांत प्रथमच लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (MoHFW) ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णसंख्या 3,700 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 360 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवार, 1 जून 2025 पर्यंत केरळमध्ये सर्वाधिक 1,400 सक्रिय रुग्ण, तर महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 रुग्ण नोंदवले गेले. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 64, महाराष्ट्रात 18 आणि दिल्लीत 61 नवीन रुग्ण आढळले. याच कालावधीत केरळ आणि कर्नाटकात प्रत्येकी एका कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली. कर्नाटकात 63 वर्षीय पुरुष (फुफ्फुसाचा क्षयरोग आणि कर्करोग) आणि केरळमध्ये 24 वर्षीय महिला (सेप्सिस, उच्च रक्तदाब, यकृताचा आजार) यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT