Panchganga river towards alert level SAAM TV
महाराष्ट्र

Kolhapur Rain Updates: कोल्हापूरला आज ऑरेन्ज अलर्ट, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Panchganga river water level: हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेन्ज अलर्ट दिलेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवरून वाहत आहे.

Chandrakant Jagtap

>> रणजित माजगावकर, साम टीव्ही

Panchganga River Towards Alert Level: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद होत असून पुन्हा एकदा पंचगंगा नदीची पातळी वाढू लागली आहे. अशातच हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेन्ज अलर्ट दिलेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवरून वाहत आहे. (Tajya Marathi Batmya)

पंचगंगा नदीची संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी सध्या 36 फूट असून इशारा पातळी 39 फूट आहे. त्यामुळे इशारा पातळीच्या जवळ नदीचे पाणी पोहोचले आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट एवढी आहे. (Latest Political News)

कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अशी परिस्थिती असताना कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. सध्या जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज नेते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT