Kolhapur Rain Updates Today,  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Rain Update : कोल्हापूरवर पुन्हा पुराचं संकट? राधानगरी धरण भरलं, पंचगंगाही इशारा पातळीवर

Kolhapur Flood News : सततच्या पावसामुळे राधानगरी धरण 96 टक्के भरलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Latest Update on Kolhapur Rain:

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये मागील १२ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे राधानगरी धरण 96 टक्के भरलं आहे.

राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे स्वयंचलित दरवाजे उघडून भोगावती नदीत पाणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसणार आहे. (Latesst Marathi News)

पंचगंगा नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका

याशिवाय पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या गावांना देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये जाऊन गावं खाली करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. (Latest News)

उद्यापासून शाळांना सुट्टी जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यातील 28 पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. या शाळांचा वापर निवारा केंद्रासाठी करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT