Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif  
महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापूर भाजपला गळती लागणार? मुश्रीफांविरोधात घाटगेंचा परिवर्तनाचा नारा

Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif : विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोल्हापूर भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण मुश्रीफांविरोधात भाजपच्या समरजित घाटगेंनी जाहिररीत्या परिवर्तनाचा नारा दिलाय. त्यामुळे घाटगे पवारांची तुतारी फुंकणार की भाजपला त्यांचं मन वळवण्यात यश येणार यावरचा हा विशेष रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी कागलमधून हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून कागलवरचा दावा मजबूत केलाय. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजपच्या समरजितसिंह घाटगेंनी 23 ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यात ते आपली राजकीय दिशा ठरवणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या पक्षातरांच्या चर्चेला ऊत आलाय.

मुश्रीफांना आव्हान देण्यासाठी घाटगे पवारांची तुतारी फुंकणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. त्याला कारणही तसंच आहे. कारण घाटगेंनी थेट सोशल मीडियावर जाहीररित्या परिवर्तनाला नारा दिलाय. घाटगेंच्या X अकाउंटवरील व्हिडिओमुऴे कोल्हापूर भाजपात धावाधाव सुरू झालीय. देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार घाटगेंशी चर्चा करून त्यांचं मन वळण्याचे प्रयत्न करणार असल्याचं भाजप खासदार धनंजय महाडिकांनी सांगितलंय.

लोकसभेत पराभूत झाल्यामुळे नाराज झालेले शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक मुश्रीफांविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. मात्र मंडलिकांनी मुश्रीफांना जाहीर पाठिंबा दिलाय. त्यात माजी आमदार संजयबाबा घाटगेही मुश्रीफांच्या तंबूत गेले आहेत. त्यामुळे घाटगेंसमोरील मुश्रीफांचं आव्हान आणखीनच वाढणार आहे. मात्र आता थेट परिवर्तनाचा नारा दिलाय. त्यामुळे घाटगे तुतारी फुंकून परिवर्तन घडवणार की स्वबळावर मुश्रीफांना आव्हान देणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gul Chinch Chutney Recipe : गुळ चिंचेची आंबट गोड चटणी, एकदा करुन बघाच

Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

SCROLL FOR NEXT