Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur: पाहुणा बनून लग्नात आला, रूबाबात कोल्हापुरी फेटा बांधला अन् लग्नात 'असा' काही कांड केला की..

Wedding Guest Turns Out to be a Thief Kolhapur: कोल्हापुरात एका भामट्याने लग्नात पाहुणा म्हणून येत नातेवाईकांच्या दागिने आणि पैशांवर डल्ला टाकला आहे.

Bhagyashree Kamble

लग्न म्हटलं आनंद आणि पाहुण्यांची रेलचेल. पण कोल्हापुरातील एका लग्न सोहळ्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. आरोपी चक्क लग्नात पाहुणा बनून आला आणि सराईत चोरट्याने चक्क हात साफ केला. आरोपी कोल्हापूरी फेटा बांधून आला आणि त्याने संधी साधत दागिन्यावर डल्ला टाकला. भामट्याने एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी कोल्हापुरातील आदमापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील आदमापूरमध्ये एक लग्न सोहळा पार पडत होता. या लग्न सोहळ्यात आरोपी देखील पोहोचला. आरोपीने पाहुणा म्हणून लग्नात हजेरी लावली. तसेच कोल्हापूरी फेटा देखील बांधला. त्यानंतर पाहुण्यांनी भरलेल्या लग्न सोहळ्यात चोरी करण्याची संधी शोधत होता.

जशी भामट्याला संधी सापडली त्याने लग्नातील दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकारानंतर लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ करून भामट्याला बेड्या ठोकल्या. आरोपीची चौकशी केली असता, त्याच्याकडून एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीची क्राईम हिस्ट्री

बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे येथे घरफोडी आणि जबरी चोरीचे तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. हा भामटा चोरी करून दागिने तसेच रोकड घराच्या मागील गोठ्यात किंवा जमिनीखाली पुरून ठेवत असल्याची माहित समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT