Kolhapur Panhala Fort Shiv Jayanti incident detail  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Kolhapur : शिवजयंतीला तरूणांची हुल्लडबाजी, पन्हाळा गडावर नको ते केले अन् लाज काढली, पाहा व्हिडिओ

Kolhapur Panhala Fort Shiv Jayanti incident detail : कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर शिवजयंतीदरम्यान काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे वाद. वाहनांची तोडफोड आणि धिंगाण्यानंतर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Jayanti Incident at Panhala Fort : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह असताना कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर मात्र काही तरुणांच्या अतिउत्साहामुळे या उत्सवाला गालबोट लागले आहे. शिवज्योत घेऊन येताना तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्त आणि स्वराज्याची शिकवण दिली, त्यांच्याच जयंतीदिनी अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे

पन्हाळा गडावर शिवजयंतीच्या उत्साहात काही तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आली. पन्हाळा गडावरून ज्योत घेऊन येत असताना सायलेंसरची पुंगळी काढून हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या गावकऱ्यांनी गाड्या फोडल्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात कर्णकर्कश सायलेंसर वाजवत अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजी केली. याच हुल्लडबाजीतून एका तरुणावर एडक्याने हल्ला झाल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आळा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचे प्रतीक आहेत. मात्र, काही तरुणांनी सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढत कर्णकर्कश आवाज काढत अनेक रस्त्यांवर अक्षरशः धिंगाणा घातला. हा धिंगाणा इथंच नाही थांबला तर एका ग्रुपने गाडी थेट पंचगंगा नदीत फेकल्याचा व्हिडिओ समोर आलाय तर काहींनी स्वतः एका वीट भट्टीवर गाडी पेटवली आहे. विशेष म्हणजे या हुल्लडबाजीला वैतागलेल्या केर्ले इथं स्थानिक गावकऱ्यांनी गाड्या फोडल्या. भुदरगडावर सुद्धा अशाच काही हुल्लडबाजांचा एक मोठा गाड्यांचा ग्रुप मोठं मोठे आवाज काढत गेल्याचे पाहायला मिळाले.

कसबा सांगावं इथले सुद्धा 60 ते 70 गाड्या अशाच पद्धतीने सायलेंसर काढून हुल्लडबाजी करताना पाहायला मिळाले. याच हुल्लडबाजीतून एका ठिकाणी तरुणावर एडक्याने हल्ला झाल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला आहे... विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर आशा पद्धतीने साजरी करण्याची कोणी पद्धत पाडत असेल तर अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हार्दिक पांड्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल होणार

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

SCROLL FOR NEXT