Nitesh Rane: नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज...(पहा व्हिडिओ) SAAM TV
महाराष्ट्र

Nitesh Rane: नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज...(पहा व्हिडिओ)

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन (Court) कोठडीमध्ये असणाऱ्या भाजपा आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. या दरम्यान दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली (Kankavli) तालुक्यामध्ये येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. (Kolhapur Nitesh Rane discharged from hospital)

पहा व्हिडिओ-

सरकार पक्षातर्फे अँड प्रदीप घरत तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्याकरिता अँड सतीश मानेशिंदे, अँड संग्राम देसाई, अँड राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला आहे. नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले होते. यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर (Kolhapur) येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (colleges) अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

दरम्यान जामीन मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नितेश राणेंवर उपचार सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला आहे. या प्रकरणाविषयी माहिती देत असताना अँड संग्राम देसाई यांनी सांगितले आहे की, राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासकरिता बोलावले जाणार आहे. तेव्हा उपस्थित राहावे, अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT