Kolhapur News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : निवडणुकीत जिंकला पण जगणं मात्र हरला; २७ वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर घटना

कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. पण दुसऱ्याच दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News : गावागावांतील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अनेकांनी बाजी मारली. विशेष बाब म्हणजे, निवडणुकीत तरुणांचा बोलबाला पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. पण दुसऱ्याच दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

या दुर्देवी घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. संग्राम सीताराम गुरव (वय २७) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. संग्राम हा करवीर तालुक्यातील सडोली दुमाला गावाचा रहिवाशी होता. संग्रामच्या अचानक निधनाने दुमाला (Kolhapur) गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchyat) निकाल लागण्यापूर्वीच संग्रामला ताप आला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. मध्येच त्याला कावीळही झाला. त्यामुळं संग्रामची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्याच्यावर कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

संग्रामची सडोली दुमाला ग्रामपंयात निवडणुकीत प्रभाग क्र. ३ मधून बिनविरोध निवड झाली होती. इतकंच नाही तर गेल्या निवडणुकीतही तो सदस्य म्हणून निवडून आला होता. यंदाची निवडणूक ही त्याची दुसरी निवडणूक होती. पण दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळालेली असतानाही ग्रामस्थांची सेवा करण्याआधीच त्याला मृत्यूनं गाठलं.

संग्रामचे लग्नही झालं होतं. त्याला एक वर्षाची मुलगीही आहे. गावातील सर्वच धार्मिक, सामाजिक कार्यात पुढे असणारा संग्राम असा अचानक सर्वांमधून निघून गेल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT