Kolhapur News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात प्रथमच आढळला दुर्मिळ लुसिस्टिक साप

Leucistic snakes : कोल्हापुरात प्रथमच लुसिस्टिक साप आढळून आला आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना असून मन्यार जातीच्या सापाचा मूळ रंग जावून त्याला पांढरा रंग आल्याचं प्राणीमित्र तेजस जाधव यांनी सांगितलं.

Sandeep Gawade

कोल्हापूर जिल्ह्यातील शिये फाटा येथील घरात प्रथमच दुर्मिळ लुसिस्टिक साप आढळला आहे. हा विषारी साप मन्यार आहे, मात्र त लुसिस्टिक असल्याकारणाने त्याचा मूळ रंग नाहीसा होऊन पूर्णपणे पांढरा झालेला आहे. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. अशा प्रकारचे साप तयार झाल्यानंतर ते कोणत्या जातीचे आहेत हे ओळखता येत नसल्याने अनावधानाने त्याला हाताळलं जातं आणि त्यातूनच दंश होतो प्राणीमित्र तेजस जाधव यांनी सांगितलं.

सर्पमित्र देवेंद्र हलगी आणि सौरभ कदम या दोघांना शिये फाटा येथील घरात एक पांढऱ्या रंगाचा साप आढळून आला. पांढऱ्या रंगाचा साप असल्याकारणाने त्यांनी छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे प्राणीमित्र तेजस जाधव आणि विनायक आळवेकर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. तेजस जाधव यांनी शिये फाटा येथे येवून विषारी साप मन्यार आहे. पण लुसिस्टिक असल्याकारणाने त्याचा मूळ रंग नाहीसा होऊन हा पूर्णपणे पांढरा झालेला आहे आणि ही घटना अतिशय दुर्मिळ आहे असे तेजस जाधव यांनी सांगितले.

अशा प्रकारचे साप तयार झाल्यानंतर ते कोणत्या जातीचे आहेत हे ओळखता येत नसल्याकारणाने अनावधानाने त्याला हाताळले जातं आणि त्यातूनच मग दंश होतो. त्यामुळे सर्पमित्रांनी असे साप आढळल्यानंतर काळजीपूर्वक आधी जाणकार लोकांना विचारून मगच त्या सापाला सुरक्षित रित्या पकडावे त्यानंतर मग तो साप वनविभागाकडे जमा करण्यात आला. त्या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षित रित्या सोडून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT