Panchganga River Flood Saam tv
महाराष्ट्र

Panchganga River Flood : मान्सूनपूर्व पावसात पंचगंगा नदीला पूर; राजाराम बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद

Kolhapur News : मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग होत आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अजून देखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : राज्यात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. अनेक भागात तर मुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाल्यांना पूर आले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात देखील मागील तीन- चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. परिणामी बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग होत आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अजून देखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्याप्रमाणे पाऊस होत असल्याने अनेक भागात नदी/ नाल्यांना देखील पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

उन्हाळ्यात पंचगंगा नदीला पूर 
कोल्हापूर जिल्ह्यात गेली चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीला देखील मोठा पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. भर उन्हाळ्यात पंचगंगा नदीला पूर येण्याची हि पहिलीच वेळ आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास नदीच्या पुराच्या पातळीत वाढ झाल्याने दुपारी अडीच वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

साताऱ्यातही मुसळधार पाऊस 

गेली चार दिवस सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहन धारकांना ट्रॅफिक जॅमचा मोठा सामना करावा लागत आहे. तर साताराकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या नागठाणे- बोरगाव या भागांमध्ये लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT