Ambabai Temple Saam tv
महाराष्ट्र

Ambabai Temple : कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी दोन कोटींचे दान; जगदंबा देवी मंदिरात दोन किलोचा सोन्याचा मुकुट

Kolhapur News : अंबाबाई मंदिरात असलेल्या तेरा दानपट्ट्यांमध्ये भाविकांनी देणगी स्वरूपात दान केलेल्या रकमेची मोजणी पूर्ण झाली यात दीड महिन्यात भाविकांनी अंबाबाई चरणी २ कोटी १ लाख ५९ हजार २०० रुपयांचे दान

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर/ सुशील थोरात 
कोल्हापूर/ अहिल्यानगर
: देवदर्शनाला जाणारे भाविक मंदिरात भरभरून दान देत आहेत. रोख रकमेसह सोने- चांदीचे दागिने देवाच्या चरणी अर्पण करत असतात. यात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात साधारण दोन कोटी रुपयांचे दान करण्यात आले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जगदंबा देवी मंदिरात दोन किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. 

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नेहमीच गर्दी असते. मागील महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी आई अंबाबाईचे दर्शनाने केली होती. सार्वजनिक सुट्ट्यांसह शनिवार आणि रविवारचा आकडा एक लाखाच्या घरात होता. येथे आलेल्या भाविकांनी अंबाबाई चरणी भरभरून दान केले आहे. त्यामुळे अंबाबाई चरणी २ कोटींचे दान मागील दीड महिन्यात पाहायला मिळाले.

रोख रकमेची मोजणी पूर्ण 

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात असलेल्या तेरा दानपट्ट्यांमध्ये भाविकांनी देणगी स्वरूपात दान केलेल्या रोख रकमेची मोजणी सोमवारी पूर्ण झाली आहे. यात गेल्या दीड महिन्यात भाविकांनी अंबाबाई चरणी २ कोटी १ लाख ५९ हजार २०० रुपयांचे दान दिल्याची नोंद या मोजणीद्वारे करण्यात आली. मंदिरातील कारंजा चौकातील मंडपात मागील चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ही मोजणी करण्यात आली. 

जगदंबा मंदिरात २ किलो सोन्याचा मुकुट
अहिल्यानगर
: देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचे मंदिर अशी ओळख असणारे कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने मंदिरामध्ये सोन्याचा कळस तसेच देवीला दोन किलो सोन्याच्या वजनाचा देवीचा मुखवटा जगदंबा देवी सेवा संस्थांच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मिरवणूक काढत मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरामध्ये शतचिंतडी यज्ञ सोहळा आणि सहस्त्र प्राकृतिक सप्तशती पाठ सोहळा याचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT