kolhapur news  Saam tv
महाराष्ट्र

दीड फूट जागेवरून वाद टोकाला गेला; पोलीस कर्मचाऱ्यांकडून शेजारी कुटुंबाला बेदम मारहाण, गरोदर महिलेलाही सोडलं नाही

kolhapur news : कोल्हापुरात हातकणंगलेच्या दीड फूट जागेवरून वाद टोकाला गेलाय. हाणामारीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

पोलीस कर्मचाऱ्याकडून कुटुंबाला बेदम मारहाण

तक्रारीसाठी ठिय्या आंदोलन

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे अंगणातील दीड फूट जागेच्या वादातून एका पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांनी शेजारी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप करत आहेत. या प्रकरणानंतर पीडित कुटुंबाने हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

रुकडी येथील तनवीर मुजावर आणि खुदबुद्दीन मुजावर यांच्यात अंगणातील दीड फूट जागेवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. संबंधित जागा न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने जैसे थे आदेश दिलेला असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी वादग्रस्त जागेवर जेसीबीद्वारे काम सुरू असताना तनवीर मुजावर यांनी त्यास विरोध केला. त्यानंतर खुदबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत तनवीर मुजावर यांच्यासह त्यांची आठ महिन्यांची गर्भवती पत्नी आस्मा मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तत्पूर्वी, उपचार सुरू असताना आरोपींकडून घरावर दगडफेक आणि मोडतोड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरा तक्रार देण्यासाठी पीडित कुटुंब हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, तक्रार नोंदवून घेण्यास विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

प्रसार माध्यम आणि नागरिकांच्या उपस्थितीत घटनेचे व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. या मारहाणीचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तपासात नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT