Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : कारमधून बनावट दारूची तस्करी; ५ लाखाच्या मुद्देमालासह एकजण ताब्यात

Kolhapur News : कारमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत सदरची कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईत एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : दारूची चोरून लपून तस्करी अधूनमधून सुरूच असल्याचे वारंवार समोर आले आहे. यातच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यातील डॅरेल फर्नांडिस याला राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

कोल्हापुरातल्या हॉकी स्टेडियम परिसरातील आयसोलेशन हॉस्पिटल समोर करण्यात आली अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली आहे. कारमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत सदरची कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईत एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

१० लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

कारवाई दरम्यान पाच लाख रुपयांचे गोवा बनावटीच्या दारूचे ७५ बॉक्स आणि ५ लाखाची कार असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ही दारू कोणासाठी घेऊन निघाला होता; याचा देखील शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घेत आहेत.

नागपुरात गावठी कट्ट्यासह एकजण ताब्यात

नागपूर : एक वर्षापासून तडीपार असतांना शहरात देशी कट्टा आणि जिवंत काडतूससह आरोपीला अटक केली. गिट्टीखदान पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केली. मनीष ऊर्फ लक्की पिल्ले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गिट्टीखदान परिसरात तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस गेले असताना लक्की पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोली : राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT