Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Political News: कोल्हापुरात महापौरपदावरून राजकारण तापलं; शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने

Kolhapur Political News: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका अद्याप जाहीर नाहीत. तोपर्यंत कोल्हापुरात शिंदे आणि ठाकरे सेनेत महापौर पदावरून जुंपली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर

Kolhapur Latest News In Marathi :

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. याचदरम्यान, कोल्हापुरात शिंदे आणि ठाकरे सेनेत महापौर पदावरून जुंपली आहे. महापौर आमचाच होणार असा दावा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. तर पहिल्या निवडणुका घेऊन दाखवा, मग बोला, असा पलटवार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही सेनेत चांगलेच राजकारण तापले आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूरच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटात चांगलाच संघर्ष सुरू झाला आहे. अद्याप कोणत्याच निवडणुका जाहीर झाल्या नसताना सगळ्या जागा आम्हीच जिंकू, असे दावे प्रतिदावे दोन्ही गटाकडून केले जात आहेत. त्यामुळे या दोन गटात राजकारण चांगलच तापले आहे.

'आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तेत आम्हीच येऊ, असा दावा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. कोल्हापुरात प्रलंबित असलेले अनेक प्रश्न या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना सोडवता आले नाहीत, असे क्षीरसागर म्हणाले.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या सगळ्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खंडपीठ, हद्दवाढ या सारखे प्रश्न हे सरकार सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. शहरवासीयही आता शिवसेनेच्या पाठीशी असून महापौर आमचाच असेल, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केलाय.

'महापौर आपलाच होणार म्हणत क्षिरसागर यांनी सगळ्यांनाच अंगावर घेतले आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडे असलेल्या सत्तेवर त्यांनी टीका केली आहे. मात्र, ठाकरे गटानेही आता त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहिल्या निवडणुका घेऊन दाखवा, मग बघा, अशा शब्दात संजय पवार यांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, निवडणुका अद्याप लांब असतानाच शहराच्या विकास कामावरून दोन्ही सेनेत वाद रंगू लागला आहे. यात राजेश क्षीरसागर यांनी आघाडी घेऊन संधी मिळेल. तिथे ठाकरे गटासह महाविकास आघाडीला डिवचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना हा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT