Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये हाणामारी; कार्याध्‍यक्ष निवडीवरून वाद

संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये हाणामारी; कार्याध्‍यक्ष निवडीवरून वाद

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री संत बाळूमामा देवस्थान (Sant Balumama) ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये जोरदार हाणामारी (Kolhapur) झाल्याची घटना आज घडलेली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. फ्री स्टाईलने आणि हातात कोल्हापुरी पायतान घेऊन ही हाणामारी झाली. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षांचा मृत्‍यू झाला आहे. त्यांना एक महिन्याचा कालावधी लोटून गेला. या ट्रस्टचे बारा सदस्य विश्वस्त म्हणून हयात आहेत. त्यापैकी एखाद्या व्यक्तीची कार्याध्यक्ष पदी निवड करायचे असं ठरवण्यात आले होते. मात्र देवालयाचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी स्वतःला कार्याध्यक्ष संबोधन इतर सर्व सदस्यांना सर्व विश्वस्तांना नोटीस पाठवली होती. यासाठी कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी ट्रस्टमधील काही सदस्य आणि ग्रामस्थ आज कोल्हापुरात वकिलांची भेट घ्यायला आले. यावेळी धैर्यशील भोसले यांच्यासह इतर दहा ते बारा जणांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आदमापुरचे सरपंच यांनी केला आहे.

फ्री स्टाइल हाणामारीचा सर्व प्रकार झाल्यानंतर काही लोक कोल्हापुरातील विश्वकर्मा पार चित्र असलेल्या वकिलांच्या दारात जमले. त्यामुळे या परिसरात अधिक तणाव निर्माण झाला. तर ज्या सदस्यांवर प्राणघातक हल्ला झाला, ते सदस्य पुन्हा परातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. विश्वकर्मा पार्क इथे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस सत्कार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या सर्व जमावाला पिटाळून लावले.

उद्या कार्याध्‍यक्ष निवड

दरम्‍यान मंगळवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजता आदमापूर इथल्या देवालय परिसरात कार्याध्यक्षची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा; अशी मागणी सदस्यांनी केलेली आहे. आज कोल्हापुरात जो प्रकार घडला तो निदान बाळूमामाच्या देवालयात होऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

SCROLL FOR NEXT