Vidhan Sabha Election Result Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election Result : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; मतदारसंघातून अमल महाडिकांचा विजय निश्चित

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यात राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असून याचा जल्लोष राज्यभरात केला जात आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आघाडी घेतली आहे. यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला असल्याने भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यात राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असून याचा जल्लोष राज्यभरात केला जात आहे. दरम्यान कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन भाजपचे अमल महाडिक हे उभे असून निकालात १५ व्या फेरीअखेर १६ हजार २९९ पेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष सुरू केला आहे. 

फटाक्यांची आतषबाजी 

दरम्यान कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत भाजपचा ध्वज फडकवत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. अमल महाडिक यांचा विजय या मतदारसंघातून जवळपास निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. अमल महाडिक यांचे शाहूपुरीत कार्यालय आहे. याच कार्यालयाबाहेर आता शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचं कारण काय? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Silver Jewellery Cleaning Tips: चांदीचे दागिने घरी कसे साफ करायचे?

Health Care: बटाटे की रताळं...; रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय चांगल आहे?

SCROLL FOR NEXT