kolhapur, CPR Hospital Kolhapur saam tv
महाराष्ट्र

CPR Hospital Kolhapur : सापाच्या भीतीने चिमुकला तापानं फणफणला अन् पुढं घडलं अघटित

या घटनेमुळे बालकाच्या पालकांना माेठा धक्का बसला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे या गावातील बालकाचा सापावर पाय पडल्याच्या भीतीने ताप येऊन मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. अर्णव नवनाथ चौगुले (arnav chaugule) असं मृत्यूमुखमी पडलेल्या मुलाचं नाव असल्याची माहिती सीपीआरमधून मिळाली. (Maharashtra News)

अर्णव हा इयत्ता दुसरीत होता. नेहमीप्रमाणे ताे गुरुवारी शाळेला गेला होता. शाळेतून आल्यानंतर त्याला ताप भरून आला. त्याच दिवशी गावात एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची चर्चा होती.

या भीतीपोटी माझा ही सापावर पाय पडला असे अर्णव पालकांना सांगत होता. या भीतीने त्याला ताप आला. घरच्यांनी सर्पदंश झाला असेल या भीतीपोटी सीपीआरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ताप वाढल्याने अर्णवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे विमानतळ परिसरात कारने अचानक घेतला पेट

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

SCROLL FOR NEXT