Crime News Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापुरात खळबळ! व्याजाच्या पैशाच्या बदल्यात जबरदस्तीनं शरीरसंबंध; महिलेला हॉटेलवर नेलं, विविस्त्र व्हिडिओ काढले

Kolhapur crime : कोल्हापूरमध्ये व्याजाने घेतलेल्या २ लाखांच्या बदल्यात महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी अमित सावंतने नग्न व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले.

Namdeo Kumbhar

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Kolhapur woman blackmailed with nude videos over loan : कोल्हापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ड्रायव्हर म्हणून सोबत येणाऱ्या व्यक्तीने वारंवार पैशाची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची महिलेकडून तक्रार करण्यात आली आहे. वेळोवेळी हॉटेलवर नेऊन नग्न अवस्थेत फोटो, व्हिडीओ काढून जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे, या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जावयालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये अमित सावंत या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करत ३ वर्षे महिलेवर वारंवार बलात्कार केला.

पीडित महिला एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे. २०२३ मध्ये आर्थिक अडचणींमुळे तिने सावंतकडून 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. काही महिने व्याजाची परतफेड केल्यानंतर आर्थिक ओढाताण वाढली. याचाच गैरफायदा घेत आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. यानंतर या व्हिडिओच्या आधारे आरोपीने महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत हॉटेल आणि चालत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार केले.

पीडितेने नोव्हेंबर २०२५ पर्यंत व्याजासह 2 लाख 10 हजार रुपये परत केले, तरीही केवळ 25 हजार रुपयांसाठी आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा आरोपीने हे अश्लील व्हिडिओ कार मालकाला पाठवून महिलेची बदनामी केली. जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या जावयालाही आरोपीने बेदम मारहाण केली. या सर्व त्रासाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीवर मात करत अखेर पीडितेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

चौकशीत समोर आले की, आरोपी सावंत हा चालक म्हणून काम करत होता आणि महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्याने तिचे नग्न व्हिडिओ तयार केले. “व्हिडिओ व्हायरल करेन” अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केले. मुद्दल आणि व्याज फेडूनही आरोपीची पैशांची वासना संपली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT