panchganga  
महाराष्ट्र

कोल्हापूरवासियांची चिंता वाढली; पंचगंगेचे पाणी पात्रा बाहेर

संभाजी थोरात

काेल्हापूर : गेल्या दाेन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काेल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत माेठी वाढ झाली आहे. काेल्हापूर शहरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले आहे. पंचगंगा panchganga नदीची पाणी पातळी 28.50 इतकी झाली आहे. (kolhapur-heavy-rain-panchganga-river-water-level-increased-sml80)

हवामान खात्याने आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे काेल्हापूरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सततच्या पडणा-या पावसामुळे प्रशासनाने काेल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंदगड, आजरा, गडिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा या तालुक्यांत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडावे. नदी पात्रांची पाणी पातळी वाढू लागल्यास पूलावरुन, आेढ्यावरुन शक्यताे वाहतुक टाळावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांसह ८ नगरसेवक भाजपमध्ये

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची नोटीस धडकली, नेमकं प्रकरण काय?

Solapur politics : एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, तानाजी सावंतांच्या भावाने साथ सोडली, आता कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

SCROLL FOR NEXT