Maharashtra election 2024 Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Panchayat News : राजर्षी शाहू नगरीत धर्मांधतेचा कळस, मुस्लिमांना मतदानापासून रोखण्याचा डाव? वाचा काय आहे प्रकरण, VIDEO

Kolhapur Panchayat News update : महाराष्ट्रात हरियाणातील खाप पंचायती जन्म घेतायेत. हो तुम्ही जे ऐकताय ते खरंय. कारण शाहुंच्या कोल्हापुरातील शिंगणापुर ग्रामपंचयातीनं लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासलीये. या ग्रामपंचायतीनं मुस्लिमांना मतदानापासून रोखण्याचा ठराव केला. का असा ठराव या ग्रामपंचायतीला करावा लागला पाहूया या रिपोर्टमध्ये

साम टिव्ही

स्नेहील झणके, साम टीव्ही

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांमुळे मविआला घवघवीत यश मिळालं. या मुस्लिम मतांचं महत्व महायुतीला कळल्यामुळे त्यांनीही बुरखा वाटपाचे कार्यक्रम घेत मुस्लिस मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. परंतु कोल्हापुरच्या शिंगणापूर ग्रामसभेत चक्क मुस्लिम मतदारांना नाकारण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

त्याच झालं असं की, शिंगणापूरच्या ग्रामसभेत मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीत समाविष्ट करु नये, असा ठराव मांडला गेला. या ठरावावर टीका झाल्यानंतर गावात बांग्लादेशी महिला असल्यामुळे त्यांची नावं मतदार यादीत घेऊ नका, असा अटकाव करण्यासाठी आम्ही ठराव केल्याची सारवासारव सरपंच रसिका पाटील यांनी केली. तर ठराव करणारे कोणत्या पक्षाचे आहेत याचा शोध घ्या, असं सांगत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाईची पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली.

या निमित्तानं साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले आहेत. मुळात जर त्या कथित महिला बांग्लादेशी असतील तर त्यांची पोलिसात तक्रार का केली नाही? दोन महिलांमुळे सगळ्या अल्पसंख्याक समाजाला मतदानापासून रोखण्याचा अधिकार ग्रामसभेला कोणी दिला? समानतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोल्हापूरात धर्मांधतेचं विष कोण पसरवतंय? असे सवाल साम टीव्हीने उपस्थित केले आहेत.

घडल्या प्रकारानं महाराष्ट्रातील ग्रामपंचायत या हरियाणातल्या खाप पंचायती बनत चालल्या की काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. थेट नागरिकांच्या मतदानाचा हक्क केवळ धर्मद्वेषामुळे हिरावून नेण्याचा डाव करणा-यांवर कारवाईची मागणी यानिमित्तानं होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT