गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
शेतकरी आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार
महायुतीमधील वादांवर टीका करत मतदारांनी महायुतीला नाकारलं
गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा पहिल्यांदाच इतकी गाजली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गडाला भगदाड पाडून सत्ता खेचून आणली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सतेच पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीचा डाव लोकांनीच कसा हाणून पाडला हे सांगितलं.
शेतकरी आणि दूध उत्पादकांना आम्ही केंद्र बिंदू मानून प्रचार केला. त्याचाच परिणाम पाहिला मिळाला. दूध उत्पादकांनी आम्हाला बहुमत दिलंय. महायुतीमध्ये होणारे वाद पाहून लोकांनी आम्हाला निवडलं. शेवटी एक होणार होते तर आधी वाद का केला? असा सवाल करत लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यांच्या शपथांचा परिणाम मतदारांवर झाला नाही. तसेच गोकुळचा कारभार हा एकमुखी कारभार असावा, तो जिल्ह्यातूनच चालवा हे लोकांना वाटतं. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असल्याचं लोकांनी निकालातून दाखवून दिल्याचं सतेच पाटील म्हणाले.
सतेज पाटील आपल्या विजयाविषयी बोलताना म्हणाले की, दूध उत्पादकांनी आम्हाला बहुमत दिलंय. जर जनरल कोट्यातून ९८ मते बाद झाली नसती तर आमच्या अजून ८ जागा वाढल्या असत्या. काही मते अवैध ठरली नाहीतर आमच्या आघाडीने २० जागा जिंकल्या असत्या असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आणि माजी अध्यक्षांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. एकूण २ अर्ज दाखल केले होते. पण निवडणूक आयोगांनी मतमोजणी अचूक झाली आहे, असं सांगत अर्ज नांमजूर केले. त्यामुळे सतेज पाटलांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यावरून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली. हसन मुश्रीफ आणि नरके यांनी खेळाडू वृत्तीनं हा पराभव स्वीकारावा हवा होता. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी फेरमत मोजणीचा अर्ज करायला नको होता. त्या अर्जामुळे निकाल तीन तास उशिराने लागल्याचं पाटील म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आणि युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केले होते. याआधी आणखी एक अर्ज आला होता, असे ३ अर्ज संध्याकाळी महायुतीकडून करण्यात आले. परंतु ते उमेदवार फेरमतमोजणीमध्येही पराभूत झाले. पण, या फरमतमोजणीमध्ये सतेज पाटील यांच्या हातातून एक जागा मात्र गेली. यात महायुतीच्या अमर पाटील यांचा विजय झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.