गोकुळ निवडणूक निकाल २०२६ आणि अध्यक्षपदाची निवड
गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या आघाडीला १३ जागांवर विजय
गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कसा सुटणार?
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी 13 जागा जिंकून महायुतीवर विजय मिळवला खरा..मात्र आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण अध्यक्ष निवडीवरून तांत्रिक पेच निर्माण झालाय. त्यामुळे आता गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांना साद घातलीय...सतेज पाटलांनी कशी रणनीती आखलीय. पाहा.
येत्या 29 ऑक्टोबरला गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांची अध्यक्ष निवडीसाठी बैठक होणार आहे.
समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला 12 जागा मिळाल्यानं अवघ्या एका जागेच्या फरकामुळे महायुतीनं अद्याप हार मानलेली नाही...
अध्यक्षनिवडीवेळी 14 जणांचा कोरम पूर्ण करणं बंधनकारक अन्यथा अर्धा तासासाठी सभा तहकूब केली जाते
अर्धा तासानंतर सभा घेऊन उपस्थित सदस्यांमधून अध्यक्षाची निवड करता येते.
त्यात पहिल्या सभेला नवनिर्वाचित सर्व 25 सद्स्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक असल्यानं सतेज पाटलांच्या गटाचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात सतेज पाटलांनी स्वत: महायुतीच्या नेत्यांना फोन करून सभेला उपस्थित राहण्याची विनंती केलीय. तरीही महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आणि काही तांत्रिक कारणामुळे अध्यक्ष निवड झाली नाही तर गोकुळवर प्रशासकराज आल्यास शेतकऱ्याचं नुकसान होईल, असा दावा सतेज पाटलांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.