रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
Gokul Dairy new president name, Mahadevrao Mahadik Gokul pattern : कोल्हापूरची अस्मिता असलेल्या प्रसिद्ध 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा इतिहास घडला आहे. गेल्या २५ वर्षांपासून चालत आलेला माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा 'लेटर पॅटर्न' यंदा पूर्णपणे मागे पडला आहे. महायुती १२ आणि समविचारी पक्षाचे १३ सदस्य आहेत. आज अध्यक्षपदाची निवड होणार आहे. मागील २५ वर्षांपासून महाडिक यांच्यामार्फतच अध्यक्षपदाची निवड होत होती. पण यंदा महाडिक पॅटर्नला ब्रेक लागला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महादेवराव महाडिक यांचाच शब्द अंतिम मानला जात होता. मतदानाच्या अवघ्या एक तास आधी एका बंद लिफाफ्यातून ते नव्या अध्यक्षाचे नाव पाठवायचे आणि त्याच नावावर मुहर लागायची. मात्र, यंदा गोकुळमध्ये प्रत्यक्ष निवडणूक लागल्यामुळे महायुती सक्रिय झाली असून महाडिकांचा हा २५ वर्षांचा पॅटर्न निष्प्रभ ठरला आहे.
महायुतीत अध्यक्षपदासाठी रस्सीखेंच
महाडिक पॅटर्न मागे पडल्याने आता महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांना सव्वा-सव्वा वर्षांचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीच्या ३ आणि समविचारीच्या एका नावाची चर्चा आहे.
भाजप: डॉ. चेतन नरके
शिंदे शिवसेना: अजित नरके
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): रणजितसिंह पाटील आणि राजेश पाटील
समविचारी गट: शशिकांत चुवेकर
पोलीस ठाण्याबाहेर कडक बंदोबस्त
अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत कोणताही गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही या ठिकाणी तैनात आहेत. शासन नियुक्त ४ सदस्यही मतदानासाठी पोहोचले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर – सतेज पाटील
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या एकूण प्रकरणावर २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीबाबत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सकारात्मकता दाखवली असून न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपण आदर करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.