Rs 50  Saam tv
महाराष्ट्र

मतपेटीत ५० रुपयांची नाेट; KDCC बॅंकेत सर्व नेते एकत्र येतील, चिठ्ठ्यांनी उडवला धूरळा

आज काेल्हापूर जिल्हा बॅंकेचा निकाल लागणार आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीस (Kolhapur DCC bank election result) प्रारंभ झाला आहे. एका मतेपटीत चक्क ५० रुपयांची (Rs 50) नाेट सापडली आहे. या बराेबरच काही चिठ्ठ्या देखील अधिका-यांना सापडल्या आहेत. या चिठ्ठीतून बहुतांश नेत्यांना टाेला लगावला आहे. (kolhapur district bank election result latest updates)

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या मतांची विभागणी सुरु आहे. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (satej patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर त्याचबरोबर खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

एका मतपेटीतून निघालेल्या चिठ्ठ्यांत मजेशीर तसाच टाेमणे मारणारा मजकूर हाेता. सर्व उमेदवार राजकारणी (political) असून निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणार असल्याचा टोला लगावला आहे. नेत्यांच्याजवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल ही तक्रार असल्याची म्हटलं जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT