Kolhapur  Crime News
Kolhapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: विषारी पावडर पाण्यात मिसळून प्यायले अन्... पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कोल्हापुरात खळबळ

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, प्रतिनिधी...

Vadange Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात पती पत्नीचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मधुकर दिनकर कदम आणि जयश्री मधुकर कदम अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Crime News In Marathi )

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुर जिल्ह्यात पतीपत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील वडणगेत ही घटना घडली असून मधुकर दिनकर कदम आणि जयश्री मधुकर कदम अशी मृत्यू पती पत्नीची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कदम हे सेवानिवृत्त एसटी कर्मचारी होते. दोघांनी औषध पावडर पाण्यात मिसळून प्राशन केले. त्यानंतर दूध आणण्यासाठी बाहेर गेलेले मधुकर कदम यांना चौकात चक्कर आली तर घरात स्वंयपाक करत असलेल्या जयश्री यांना श्वास घेण्यास त्रास होवून त्या बेशुद्ध झाल्या. (Kolhapur News)

या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू असून ही आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Today's Marathi News Live: शेगाव खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT