Kolhapur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीत तोडफोड, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Crime News : कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

Satish Kengar

>> रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News : कोल्हापुरात चारचाकीच्या कर्जापोटी दुप्पट हप्ता आकारण्याच्या रागातून मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात तिघांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय. तोडफोडे नंतर भयभीत झालेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेतली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात असणाऱ्या आयोध्या टॉवरमध्ये दुसऱ्या मजल्यावर मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या फायनान्स कंपनीकडून चार चाकीसह मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज दिलं जातं. कदमवाडी परिसरातील प्रदीप गरड या ग्राहकांना चार चाकी साठी कर्ज घेतलं होतं. (Crime News)

दर महिन्याच्या पाच तारखेला कर्जाचा हप्ता वसूल केला जातो. गरड याने हप्ता भरला नसल्याने कंपनीतील रुपेश पाटील यांनी फोन केला यानंतर प्रदीप गरड याने हप्त्याची रक्कम ऑनलाईन भरली, मात्र नजर चुकीने गरड याच्याकडून दोन हप्ते भरले गेले. त्यानंतर गरड याने कंपनीच्या कार्यालयात जाऊन नजरचुकीने भरलेली रक्कम पुन्हा मिळावी, अशी मागणी केली. (Latest Marathi News)

मात्र ऑनलाईन भरलेले पैसे दहा दिवसात परत दिले जातील, असं त्यांना सांगण्यात आलं. यामुळे संतप्त झालेल्या गरड आपल्या दोन मित्रांसमवेत क्रिकेटच्या बॅटीतच्या साह्याने कार्यालयात घुसून तोडफोड केली.

यामध्ये टेबल खुर्च्या फॅन आणि काचा यांचं मोठं नुकसान झाले. अचानक सुरू झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, याबाबत शाहूपुरी पोलिसांकडे कर्मचाऱ्यांनी दाद मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT