भुदरगड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये मद्य प्राशन केलेल्या सहायक फौजदाराने बिल न देण्याच्या कारणावरून धिंगाणा घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. तो उघड होताच जिल्हा पोलीसप्रमुखांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली. तानाजी रामचंद्र विचारे असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव आहे.
गारगोटी-पिंपळगाव रोडवरील धामणे फाट्यानजीक असलेल्या एका हाँटेलमध्ये भुदरगडचे सहायक फौजदार तानाजी विचारे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेवण्यासाठी गेले होते. जेवण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बिल देण्यास नकार देऊन हॉटेल मालकास मारहाण केली. तसेच मद्यप्राशन केल्याने जोरदार धिंगाणा घातला. या प्रकरणाची जिल्हा पोलिसप्रमुखांनी गांभीर्याने दखल घेतली. याबाबतचा सविस्तर अहवाल मागविला होता. तो सादर करताच जिल्हा पोलीसप्रमुखांनी सहायक फौजदार तानाजी विचारे याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी साताऱ्यात एक दुकान लुटून त्यातील रकमेतून बॉम्ब बनवण्याचे सामान खरेदी केले (Pune ISIS Terrorist Case) होते. त्यांनी १ लाख रुपये किमतीचे बॉम्ब बनवण्याची सामग्री खरेदी केली होती. (Latest Crime News)
साताऱ्यामध्ये शाहनवाज आलम व मोहंमद साकी यांनी दुकानात लूटमार केल्यानंतर चोरी केलेली रोकड ही दहशतवादी कृत्यासाठी वापरली होती. आरोपींनी तयार करण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्या विविध ठिकाणच्या जंगलात घेतल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झालं (Terrorists Robbed Shop In Satara) आहे. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.