Kolhapur Crime :  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime : संतापजनक! कोल्हापुरात १० वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

Kolhapur Crime news : कोल्हापुरात धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. कोल्हापुरात १० वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. ऊसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्यात चिमुकल्यांवरील होणारे अत्याचार संपता संपेना... राज्यात प्रत्येक दिवसाला चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. बदलापूरनंतर मुंबई,नाशिक, अहमदनगरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर आता कोल्हापुरातही १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील शिये गावातील राम नगर परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अत्याचार पीडित मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

आज गुरुवारी महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झालेला आहे. १० वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश करण्यास सुरुवात केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

मुंबईतही अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबईतील कांदिवलीत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. याचा गैरफायदा घेऊन शेजाऱ्याने दिव्यांग मुलीवर अत्याचार केला आहे. शेजाऱ्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

अत्याचारानंतर मुलगी काही दिवस बोलत नसल्याने आईला शंका आली होती. आईने मुलीला धीर देऊन विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला आहे. आईच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT