Kolhapur court rejects Prashant Koratkar bail application  Saam Tv News
महाराष्ट्र

मोठी बातमी! कोल्हापूर कोर्टाचा प्रशांत कोरटकरला दणका, जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होणार

Prashant Koratkar Bail Application Rejected : प्रशांत कोरटकर हा फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर आहे. पण तो पोलिसांना सापडत नाही. त्याने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करुन धमकी देणाऱ्या तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर सेशन कोर्टाने प्रशांत याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोल्हापूर सेशन कोर्टात कालच या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. कोर्टाने तीनही वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. अखेर कोल्हापूर सेशन कोर्टाने आज याबाबत निकाल सुनावला आहे. हा निकाल प्रशांत कोरटकर याला मोठा धक्का देणारा आहे.

प्रशांत कोरटकर हा फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर आहे. पण तो पोलिसांना सापडत नाही. त्याने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. त्याने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे कोर्टाकडून त्याला दोन वेळा अंतरिम जामीन मिळाला. पण आता त्याला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस आता कोरटकरला कधी ताब्यात घेतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT