Kolhapur Car Accident Update  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Car Accident: कोल्हापूर अपघातात मोठी अपडेट, ६ जणांना चिरडणारी कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंची

Kolhapur Cyber Chowk Accident: कोल्हापूरच्या सायबर चौकामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये झालेल्या भीषण कार अपघाताबाबत (Kolhapur Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. ६ जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोल्हापूर पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकसह तिघा जणांचा मृत्यू झाला.तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. या अपघातामध्ये दुचाकीसह काही व्यक्ती चेंडूसारख्या दूरवर जाऊन पडल्या. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण ही कार चालवत होते.

सायबर चौक परिसरात आल्यानंतर वसंत चव्हाण यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात १६ वर्षीय हर्षद सचिन पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला असून याची अद्यापही ओळख पटलेली नाही. कोल्हापूर पोलिसांकडून या अपघात प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT