Kolhapur Crime Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur News: बेधुंद मद्यपार्टी.. ६० पुरुष अन् ४० महिलांचा समावेश; कोल्हापूर पोलिसांनी केली कारवाई!

Kolhapur News: पार्टी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्ये साठा रोख रक्कम आणि डीजे असे सुमारे दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर| ता. २६ डिसेंबर २०२३

Kolhapur News:

पुणे बेंगलोर महामार्गावरील उजळईवाडी इथे सुरू असणाऱ्या विनापरवाना पार्टीवर पोलिसांनी रविवारी (२४, डिसेंबर) रात्री छापा टाकला. या प्रकरणी पार्टी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्ये साठा रोख रक्कम आणि डीजे असे सुमारे दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Kolhapur News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उजळेवाडी परिसरात सुरू असणाऱ्या एका कॅफेमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New year Celibration) पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतची टीप पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून या पार्टीवर छापा टाकला .

या पार्टीमध्ये 60 पुरुष आणि 40 हून अधिक महिलांचा सहभाग असल्याचे दिसून आले. याप्रकरणी कॅफे 'माया' चा मालक दयानंद जयंत साळुंखे, पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी, डीजे ऑपरेटर गणेश लहू खरात, मालक दिगंबर रघुनाथ सुतार यांच्यासह कामगारांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारवाईत एकूण ५३ हजार ७२५ रुपयांची विदेशी दारू, ८८ हजार ७४० ची रोकड, १ लाख ४० हजारांची डीजे सिस्टीम असा एकूण २ लाख ८२ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

SCROLL FOR NEXT