Kolhapur Flight Cancle:  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Airport News: पायलटची ड्युटी संपली, कंपनीने विमानच रद्द केले; प्रवाशांचे हालच हाल

Kolhapur Flight Cancle: कंपनीने कोल्हापूर- बंगळुरू हे विमानच रद्द केल्याचा प्रकार सोमवारी कोल्हापुर विमानतळावर घडला. कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, ता. १६ मे २०२४

पायलटच्या ड्युटीची वेळ संपल्याने आणि दुसरा पायलटही उपलब्ध नसल्याने कंपनीने मुंबई कोल्हापूर- बंगळुरू हे विमानच रद्द केल्याचा प्रकार सोमवारी कोल्हापूर विमानतळावर घडला. कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई- बेंगलोर हे विमान प्रथम कोल्हापूरला येते आणि पुढे पाच वाजता बंगळुरूकडे रवाना होते. मात्र, मुंबईत सोमवारी झालेल्या वादळामुळे या विमानाला कोल्हापुरात येण्यास तासभर उशिर झाला. यामुळे संबंधित विमानाच्या पायलटची ड्युटी संपल्याने त्याला हे विमान पुढे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. हे विमान पुढे घेऊन जाण्यास संबंधित विमान कंपनीकडे पायलट नसल्याने हे विमान अचानक रद्द करण्यात आले.

कोल्हापूर विमानतळावरून सायंकाळी ४:५५ वाजता हे विमान बंगळुरूकडे जाणार होते. यामध्ये ५० च्या आसपास प्रवासी होते. हे प्रवासी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विमानतळावर आले होते. मात्रअचानक विमानच रद्द केल्याने प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी सकाळी हे विमान दुसऱ्या पायलटच्या मदतीने बंगळुरूला पोहोचवण्यात आले.

दरम्यान, चालकाची ड्युटीची वेळ संपल्याने थेट विमानच रद्द होण्याची पहिलीच वेळ असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच संबंधित विमान कंपनीने नियमावर बोट ठेवून ही कृती केली असली तरी प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी टोलजप्ती, जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT