Kolhapur Balumama Temple News  AI Image
महाराष्ट्र

Balumama Temple Trust : बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार, ५ जणांना अटक, नेमकं प्रकरण काय?

Balumama Temple Trust Case Update : आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित ६० कोटी ७४ लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू. जमीन व्यवहार प्रकरणात पाच जणांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपासाला वेग.

Alisha Khedekar

  • दमापूरच्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार

  • लेखापरीक्षणात ६० कोटी ७४ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा उल्लेख

  • जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित प्रकरणात पाच जणांना अटक

आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. लेखापरीक्षणात तब्बल ६० कोटी ७४ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात निढोरी आणि मुरगूड परिसरातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून भीष्म सूर्यवंशी, रणजित सूर्यवंशी, प्रकाश मांगले, सागर शिंदे आणि तन्मय बाचणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर या प्रकरणातील तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

लेखापरीक्षणादरम्यान ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचे समोर आले आहे. विशेषतः जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. ट्रस्टच्या निधीचा वापर, व्यवहारांची कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रागिणी खडके आणि काही ट्रस्टी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून ते फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून ट्रस्टमधील कथित गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्या पद्धतीने अनियमितता झाली, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे भाविकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT