Kolhapur: भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक; तरुणांचा जागीच मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक; तरुणांचा जागीच मृत्यू

कागल- मुरगूड रस्त्यावर भडगाव ता. कागल या येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: कागल- मुरगूड रस्त्यावर भडगाव (Bhadgaon) ता. कागल या ठिकाणी कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये (terrible accident) एम.आय.डी.सी (MIDC) मध्ये कामावर असणाऱ्या तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैभव शिवाजी धुरी (वय- 25) रा दोनवडे ता.भुदरगड (Bhudargad) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Kolhapur Accident The car hit the two wheeler)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीवरून, वैभव आज सकाळी एम.आय.डी.सी मधून कामावरून आपल्या दुचाकी (MH-09-EP-1918) वरून घरी जात होता. कागल मुरगूड (Murgud) रस्त्यावर भडगाव फाट्यावर त्याची चारचाकी (MH-09-AN-1954) गाडीशी जोरदार धडक झाली आहे. या धडकेमध्ये वैभवच्या डोक्याला जबर मार लागला होता.

वैभवच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणातून रक्तस्त्राव झाला होता. तात्काळ त्याला मुरगूडच्या ग्रामीण (Rural) रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस (Police) या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT