Kolhapur Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापुरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव कारने आईसह चिमुकल्याला उडवलं; भयानक सीसीटीव्ही VIDEO

Kolhapur Accident: कोल्हापुरात भयंकर अपघात झाला. भरधाव कारने आई आणि मुलाला धडक दिली. या अपघातामध्ये आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरातून भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या आई आणि चिमुकल्याला उडवले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली. तर चिमुकल्याला देखील दुखापत झाली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरमधील रिंगरोड बोंद्रेनगर येथे भीषण अपघात झाला. शाळेतून मुलाला घरी घेऊन येत असताना आई आणि चिमुकल्या मुलाला कारने धडक दिली. अचानक पाठीमागून आलेल्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोघांना धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की महिला अक्षरश: चेंडूसारखी वर उडून जमिनीवर पडली.

हा संपूर्ण अपघात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला आणि तिच्या चिमुकल्या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुलाला देखील दुखापत झाली आहे. दोघांवर देखील उपचार केले जात आहेत.

दरम्यान, ठाण्यातील मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरच्या चाकाखाली येऊन तिघांचाही मृत्यू झाला. गावदेवी बायपास परिसरात ही घटना घडली. या अपघातामध्ये तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हे तिघेही एका कामासाठी ठाण्यावरून शिळफाट्याला जात होते. तेव्हा त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay-Trisha Krishnan : कांजीवरम साडी अन् केसात मोगऱ्याचा गजरा; विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Maharashtra News Live Update: नंदुरबार शहरात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

SCROLL FOR NEXT