Ratnagiri News Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : तरुणींच्या नृत्यात रंगला माहोल, पण अचानक स्टेज कोसळला अन्....; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख गावातील शिवाजी चौकात दहीहंडी उत्सवात नृत्य कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Alisha Khedekar

  • रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावातील दहीहंडी सोहळ्यात स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना.

  • नृत्य कार्यक्रमादरम्यान अपघात झाला, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • काही नर्तिका किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

  • सुरक्षेची काळजी न घेतल्याने उत्सवात धोका निर्माण होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावातील शिवाजी चौकात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. राज्यभरात दहीहंडीच्या जल्लोषाची पर्वणी असताना शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सलग लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्याने हजारो गावकरी, परिसरातील तरुण मंडळी आणि कुटुंबियांनी या पारंपरिक जल्लोषाचा आनंद लुटला. गोविंदा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नृत्याच्या दरम्यान स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दहीहंडी सोहळ्यादरम्यान नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी स्टेजवर काही नर्तिका नृत्य सादर करत होत्या. परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि नागरिक उत्साहाने नृत्याचा आनंद घेत होते. मात्र अचानक स्टेज कोसळला आणि सगळ्या नर्तिका आणि स्टेजवर उपस्थित नागरिक क्षणार्धात पडले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होईल अशी भीती निर्माण झाली होती, परंतु सुदैवाने कोणताही जीवितहानीचा प्रसंग घडला नाही. नर्तिका किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये थोडा काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी स्टेजच्या बांधकामाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहीहंडी सारख्या मोठ्या जनसमूह जमणाऱ्या उत्सवांमध्ये सुरक्षेची उपाययोजना व्यवस्थित असणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

देवरुख परिसरात हा प्रकार चर्चेचा विषय ठरत असून लोक सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही याबद्दल दिलासा व्यक्त करत आहेत. राज्यभरात दहीहंडीच्या जल्लोषात काही ठिकाणी गोविंदे जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या असतानाच देवरुखच्या या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेची गरज अधोरेखित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT