Renowned kirtankar Madhukar Maharaj Barulkar dies in tragic road accident in Nanded. saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident: भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं; अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा जागीच मृत्यू

Kirtankar Madhukar Maharaj Dies in Accident : नांदेडमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण रस्ते अपघातात प्रख्यात कीर्तनकार मधुकर महाराज बारुलकर यांचे निधन झाले आहे.

Bharat Jadhav

  • नांदेड शहरातील सिडको परिसरात हा अपघात झाला.

  • प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा जागीच मृत्यू झाला.

  • भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला. वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

नांदेड शहरातील सिडको परिसरात झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर याचा जागीच मृत्यू झाला आहे.एका भरधाव ट्रकनं कीर्तनकार मधुकर महाराज यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कीर्तनकार मधुकर महाराज यांच्या मृत्यूमुळे वारकरी संप्रादयात शोककाळा पसरली आहे.

ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील राहणारे होते. मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते.मागील अनेक वर्षापासून संघटनेत सक्रीय होते. कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करून समजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत.

मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या बैठकीसाठी ते गेले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर ह.भ.प मधुकर महाराज दुचाकीने परत बारूळ गावी जातं होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते रुबी हॉटेल जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ट्रकखाली चिरडून ह.भ.प मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. लग्न गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी आहे. असे असताना शहरात जड वाहनाची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडको हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची रेलचेल दिवसभर सुरूच असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT