kirit somaiya 
महाराष्ट्र

साेमय्या साहेब! काही करा, कसेही करा 'जरंडेश्वर' मिळवून द्या

Siddharth Latkar, ओंकार कदम

सातारा : सत्तेच्या जाेरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आला आहे. आमची एकच इच्छा आहे पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा अशी मागणी भाजप नेते किरीट साेम्यांना जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी कारखानास्थळावरच केली. kirit-somaiya-latest-news-ajit-pawar-jarendeshwar-sugar-factory-koregoan-sml80

भाजप नेते किरीट साेमय्या kirit somaiya हे आज (बुधवार) सातारा आणि बारामती जिल्हा दाै-यावर आले आहेत. पहाटेच्या सुमारास साेमय्यांचे सातारा रेल्वे स्थानाकावर आगमन झाले. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास ते काेरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना स्थळावर गेले. तेथे त्यांची कारखान्याची सभासदांनी भेट घेतली. त्यावेळी सभासदांनी हा कारखाना आम्हांला पुन्हा मिळवून द्या अशी साद घातली.

ज्येष्ठ सभासद म्हणाले साेमय्या साहेब आम्ही विचार करीत आहाेत असे का घडले. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. हा कारखाना काेण गिळकृंत करीत असेल तर आम्हांला बघवत नाही. तुम्हांला आवाहन करीत आहाेत. तुम्ही काही करा, कसेही करा आम्हांला कारखाना पुन्हा मिळवून द्या. हा कारखाना सभासदांचा राहू द्या. त्यावेळेची परिस्थितीचा आत्ता विचार केला तर किती श्रम घेतले सर्वांनी याचा विचार करवत नाही.

या कारखान्यासाठी आम्ही ४० वर्ष घालवली. ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी आमच्यासाठी या कारखान्यासाठी खूप खस्ता खाल्या. काेरेगाव खटाव तालुक्यातील जनतेने शालिनीताईंना कारखाना उभारण्याची मागणी केली. ताईंनी रात्रीचा दिवस करुन कारखाना उभारला. कारखाना खूप चांगल्या पद्धतीने चालला हाेता. परंतु आत्ता सत्तेच्या जाेरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आला आहे. आमची एकच इच्छा आहे पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आयुष्य संपवलं; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT