Kirit somaiya  Saam Tv
महाराष्ट्र

वाझेने 'हे' सांगितले तर.., तेरा क्या होगा कालिया! साेमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री यांचे स्टेटमेंट घ्यावं. सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि कारवाई करावी अशी मागणी साेमय्यांनी केली.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : सचिन वाझेला (sachin vaze) सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यास मंजुरी दिली आहे. सचिन वाझे बोलू लागला तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते 'मेरा क्या होगा'. हाे हे खरं आहे त्यामुळे तेरा क्या होगा कालिया, जर वाझेंनी सांगितले की दापोलीच्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले तर अशी टिप्पणी आज (रविवार) भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) यांनी येथे (nashik) माध्यमांशी बाेलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर केली. (kirit somaiya nashik latest marathi news)

साेमय्या म्हणाले सचिन वाझेच्या वसुलीमधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले असे जर वाझेनी सांगितलं तर ' तेरा क्या होगा कालिया'. सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षीदार झाला तर ' तेरा क्या होगा कालिया'. बजरंग खरमाटे म्हणजे अनिल परबचा वाझे असेही साेमय्यांनी नमूद केले.

साेमय्या म्हणाले सचिन वाझेनी जर सांगितलं की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर 'तेरा क्या होगा कालिया'. सचिन वाझेला सीबीआयने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे. सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते 'मेरा क्या होगा'.

सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे की आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माहिती घेऊन बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी असे साेमय्यांनी नमूद केले. ते म्हणाले मुख्यमंत्री यांची जबाबदारी हाेती. त्यांच्या वर्तमानपत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीसांना का दिली नाही. मुख्यमंत्री यांचे स्टेटमेंट घ्यावं. सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि कारवाई करावी अशी मागणी साेमय्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?

SCROLL FOR NEXT