किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. 
महाराष्ट्र

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये घमासान, काळेंनी दाखवली "ती" सीडी

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषाचा आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून हे षडयंत्र रचले आहे.पोलिसांवरही त्यांचा दबाव आहे. माझ्यावरील आरोप हे धादांत खोटे आहेत, ही माझी व माझ्या सहकार्‍यांची अग्निपरीक्षा आहे. या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही निर्भिडपणे तयार आहोत, असं आव्हानही काळे यांनी दिले.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी आपण आयटी पार्कमध्ये गेलेल्या घटनेचे फुटेजही दाखवले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. पुन्हा एकदा शहरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.Kiran Kale's allegations against NCP MLA Jagtap

आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवले जात आहे. सदर कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. फिर्यादीतील उल्लेख चुकीचा आहे, असा दावाही काळे यांनी केला. आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार आहोत. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही! आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

आमदारांची ही जुनीच सवय

माता-भगिनींना, महिलांना, आया-बहिणींना पुढे घालून अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे ही या शहराच्या आमदारांना जुनी सवय आहे. हा त्यांचा जुना धंदा आहे. त्यांनी आयटी पार्कबाबत खुली चर्चा केली असती तर ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य होते.

एसपी अॉफिस फोडणाऱ्यांकडून काय अपेक्षा

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून खोटी एफआयआर दाखल करण्यास भाग पाडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शशिकांत घिगे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांच्या दबावामुळेच गुन्हा दाखल झाला.

ज्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी या देशांमध्ये एसपी ऑफिस फोडण्याचा पराक्रम केला आहे. अशा आमदारांकडून आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे आहे, असा आरोपही काळे यांनी केला आहे.Kiran Kale's allegations against NCP MLA Jagtap

शिवसेनेच्या दिवंगत माजी आमदारांच्या प्रतिमेचे दर्शन

पत्रकार परिषदेपूर्वी माजी आमदार दिवंगत अनिल भैया राठोड यांच्या शिवालय कार्यालयात जाऊन काळे यांनी प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यांनी नेहमीच अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. त्यामुळेच त्यांचा आदर्श मी मानतो. राठोड हे जगताप यांचे राजकीय विरोधक होते. काळे यांच्या या कृतीची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

त्यांना फक्त दहशत माजवायचीय

काँग्रेसच्या किरण काळे यांना केवळ आयटी क्षेत्रात दहशत माजवायची आहे. कोरोनाचा काळ नसता तर आयटी पार्कच्या माध्यमातून शहरातील किमान १० हजार तरूणांना रोजगार मिळाला असता. कुठे राजकारण करायचे हेही त्यांना समजत नाही, असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेतून केला.Kiran Kale's allegations against NCP MLA Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT