धक्कादायक! रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याने 3 तरुणांनी मिळून एकाची निर्घृण हत्या  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याने 3 तरुणांनी मिळून एकाची निर्घृण हत्या

रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्यामुळे झालेल्या वादात ३ तरुणांनी मिळून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर मधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्यामुळे झालेल्या वादात ३ तरुणांनी मिळून एकाची हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना नागपूर मधील (nagpur) हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी एका विधी संघर्ष बालकासह २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र चोपडे असे मृत तरुणाचे नाव आहे. जितेंद्र चोपडे हा आपल्या मित्राबरोबर (friend) त्रिमूर्ती धाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करायला गेला होता. जेवण करून घरी येत असताना जितेंद्र हा गाडी चालवत होता, तर त्याचे २ मित्र पाठीमागे बसले होते. घरी येत असताना चंद्रकिरण नगर येथे आरोपी विजय उगरेजा आणि रवी उगरेजा यांच्या गाडीला जितेंद्रच्या गाडीचा चुकून धक्का लागला. यावरून दोन्ही गटात चांगलाच मोठा वाद झाला.

हे देखील पहा-

आरोपी विजय उगरेजाने गाडीच्या किचनला असलेला चाकू (Knife) काढून जितेंद्रच्या छातीवर सपासप वार केले आहेत. वाद सोडवायला धावलेल्या मित्रांवर देखील विजयने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये जितेंद्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात (hospital) नेले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे. घटनेमध्ये एका विधी संघर्ष बालकासह २ आरोपींना पोलिसांनी (police) अटक केले आहे.

पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, या घटनेमध्ये एकूण ५ आरोपीचा समावेश आहे. घटनेच्या सुरूवातीला आरोपी विजय उगरेजा हा एकटाच होता. मात्र त्यांनी फोन करून आपल्या साथीदारांना तेथे बोलावून घेतले. सुरुवातीला वाद शाब्दिक होता, नंतर शाब्दिक वाद हाणामारीमध्ये वाढला होता. विजयच्या दुचाकीला चेन होती, त्याला एक छोटासा चाकू लागलेला होता. त्याच्या अगोदर शस्त्र म्हणून वापर करत विजयने जितेंद्र, सौरभ आणि प्रकाश या तिन्ही मित्रावर हल्ला चढविला आहे.

या हल्ल्यामध्ये जितेंद्रच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्या २ मित्रांनी वाद सोडून त्याला रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विजय आणि त्याच्या साथीदारानने २ मित्रावर देखील हल्ला चढविला आहे. गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ३ आरोपीला सहभागी असल्याचे दाखवले आहे, २ आरोपीला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मृतकच्या कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. त्यामुळे काही काळ हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तणावाचे वातावरण बघायला मिळत होते. या घटनेमध्ये इतर आरोपी सहभागी आहे का? याचा शोध आता हुडकेश्वर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT